कोकणात जलसंधारण करताना घ्यायची काळजी
१. मुख्य नदीवर काम करण्याआधी उपनद्या, ओढे, झरे, इत्यादि स्त्रोतांवर काम करावं.
२. गाळ काढण्याआधी, प्रवाहाच्या वरच्या भागात Gabion बंधारे (किमान २) बांधावेत. त्यामुळे पावसात लगेच परत गाळ येणार नाही.
३. गाळ काढताना, स्रोताचा नैसर्गिक उतार कायम ठेवावा. त्यांत फेरफार करू नये.
४. पाण्याच्या स्रोतावर काम करताना त्याच्या दोन्ही बाजूंचा उतार ४५ अंशांत ठेवावा. त्याने स्थिरता येते आणि बाजू ढासळून पडत नाहीत.
५. कामाचं स्वरुप ठरवताना, आधी आजूबाजूचे उतार, भौगोलिक परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहाचा वेग इत्यादि बाबींचा अभ्यास करून मगच गाळ किती काढायचा याबद्दल निर्णय घ्यावा. योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
६. शक्य होईल तेवढं स्थानिक सामान वापरावं.
७. जर बंधारा बांधायचा निर्णय घेत असाल तर "समृद्ध कोकण" च्या त्या विषयातील अधिकारी व्यक्तीकडून आराखडा तयार करून घ्यावा.
८. बंधाऱ्यांत गाळ साठू नये यासाठी त्यात पाइप (वेंट) ठेवावेत.
९. आंधळेपणाने कोणाचीही नक्कल करू नये. तसं केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अनेकदा, तो पाण्याचा स्त्रोत उध्वस्त होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्यावी.
जलसंधारणाच्या यशस्वी कामासाठी मनापासून शुभेच्छा!
डॉ उमेश मुंडल्ये.
9967054460
drumundlye@gmail.com